राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयोग व व्यापार विभाग राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन दि ७ मार्च रोजी “राष्ट्रवादी भवन” पुणे येथे करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य कार्यकारणी चे पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष ,शहराध्यक्ष यांच्या उपस्थित हि बैठक संपन्न होणार आहे .
उदयोग व व्यापार विभाग गुणात्मक, रचनात्मक आणि संघटनात्मक व्यापक काम उभे करण्याची जबाबदारी पद न मानता ही वैयक्तिक जबाबदारी समजुन येत्या काळात मोठ्या जोमानं एक टीम म्हणून आपण काम करूया व आगामी महानगरपालिका, नगरपालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्या विभागाची जबाबदारी आपण पेलूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष श्री .नागेश फाटे यांनी केले आहे
महत्वाचे कायदे निर्णय धोरणे हे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा जयंत पाटील साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली पक्ष काम करत असताना संघटना देखील अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुणात्मक पाया मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पक्षात येणारे तरुण वर्ग नेते सामाजिक घटक यामध्ये सातत्याने वाढ होत आहे हे आपल्या सर्वांसाठी खूप समाधानकारक बाब आहे. येणाऱ्या पुढील काळात तंत्रज्ञानातील बदल पचवण्यासाठी शासन म्हणजे निर्णय घेणे आवश्यक असते ते निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून योग्य ते निर्णय घेणार असल्याचे फाटे यांनी सांगितले.
तरी महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी, जिल्हाकध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे यांचे वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपणास करण्यात येत असल्याचेही सांगितले.