महाराष्ट्र – एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण घेण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेऊन मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीनंतर कामगार कृती संघटनेनं गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी सतिश पेंडसे यांची नियुक्ती केली आहे
राज्यात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. अशात आज या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक झाली आहे. या बैठकीला परीवहन मंत्री अनिल परब हेदेखील उपस्थित होते. यावेळी संघटनेनं न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे, कर्मचाऱ्यांनी कामावर परत यायला हवे, असं आवाहन केलं आहे.
‘गेले २ महिने ST कर्मचार्याचा संप चालू होता. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत २२ वेगवेगळ्या st कर्मचारी संघटनांशी प्रदिर्घ चर्चा झाली. जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. ST आणि जनतेला वेठीला धरून कुणाचाही फायदा होणार नाही, अशी भूमिका कामगार संघटनेनं मांडली.
तसंच, ‘वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला होता. वकिलसाहेब स्व:ता डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यांची नोकरी गेलीय ती आता वाचणार आहे. ST टिकवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे, ST टिकेल तर आपण टिकू, असं आवाहन सुनिल निरभवने यांनी केलं.