वडार हृदय सम्राट आदरणीय मा.श्री. विजय (दादा) चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे (सर )यांच्या नेतृत्वाखाली आज टेंभुर्णी स्मशानभुमी मध्ये वृक्षारोपण व गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी या ठिकाणी महिलांना साडी वाटप व फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ, विकास धोत्रे, विठ्ठल कोळपे, विजय देशमुख, विरांग मेथा त्याचप्रमाणे युवक नेते आकाश धोत्रे, तालुकाध्यक्ष राम पवार, कृष्णा धोत्रे, मनीष धोत्रे, गोपाळ पवार, सनी पवार, अक्षय काळे, रंजीत गायकवाड, योगेश पवार, नितीन चव्हाण, दीपक मासुळे, मयूर माने, सागर पवार, कालिदास पवार, जॉकी सुर्वे, बापू चव्हाण, शहराध्यक्ष विकास सुर्वे, प्रतीक माने, शांतीलाल माने, अनिल पवार, दादा माने, दयानंद गायकवाड, सुनिल पवार, प्रकाश धोत्रे, सुरज जाधव ,बाप्पा पवार, आकाश जगताप, अजय पवार इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गोपाळ पवार, मनीष धोत्रे, अनिल पवार, योगेश धोत्रे, दादा धोत्रे, लखन गायकवाड, सनी पवार, मयूर माने यांनी परिश्रम घेतले.