वसंत( नाना) देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त कासेगावात भव्य नागरी सत्कार सोहळा..

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील सुपुत्र कासेगाव जिल्हा परिषद सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत (नाना) देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य- दिव्य नागरी जंगी सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांना वसंत( नाना) देशमुख भव्य नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली. कासेगाव जिल्हा परिषद गटात कायम आपला राजकीय दबदबा असलेले व्यक्तिमत्व म्हणून जनसामान्यात ओळख असणारे अशी वसंत (नाना) देशमुख यांची आजपर्यंत राजकीय कारकिर्दीची ओळख आहे. त्यांच्या चांगल्या कर्तृत्वामुळे कासेगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद गटातील मित्रपरिवार यांच्या वतीने ६१ व्या वाढदिवसाचे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

गुरुवार दि. १८ रोजी सायंकाळी ५ वाजता कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कार्यस्थळावर हा भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कायदे तज्ञ सरकारी वकील उज्वल निकम साहेब हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे खासदार संजय काका पाटील, सोलापूर खासदार जयसिद्धेश्वर स्वामी ,आमदार विजयकुमार देशमुख, विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते- पाटील ,विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील ,पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, मोहोळचे आमदार यशवंत माने, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, पुणे महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख ,सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील सभासद, शेतकरी ,नागरिक कामगार यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास कासेगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कारमूर्ती वसंतनाना देशमुख भव्य नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *