वाखरी ग्रामपंचायत मध्ये होणार सरपंच फेरनिवडणूक? लवकरच नवा गडी,नवं राज्य..!

राजकीयदृष्ट्या पंढरपूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाखरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बदलाची खलबते सुरु असल्याची चर्चा गावच्या राजकीत वर्तुळातून होत आहे. विद्यमान सरपंच सौ. कविता पोरे या परिचारक गटाच्या असुन परिचारकांचे निर्विवाद वर्चस्व याठिकाणी आहे. सौ.पोरे यांची जानेवारी २०२१ मध्ये एक वर्ष कालावधीसाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती.त्यांचा कार्यकाल संपुष्टात आला असुन कोरोना काळात ऊत्तम कामगिरी त्यांनी केलेली दिसून येते.

सरपंचपदासाठी धनश्री साळुंखे,वर्षा पवार,ऊमा जगताप यांची नावे चर्चेत आहेत. साळुंखे कुटुंबीय परिचारक गटाशी एकनिष्ठ असून सन २००० आणि २००५ साली त्यांना सरपंच पदाने हुलकावणी दिली होती. यावेळी प्रामुख्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. सौ.साळूंखे या पदवीधर असुन त्यांच्यारुपाने पहिल्यांदाच तरुण व सुशिक्षित सरपंच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उपसरपंचपदासाठी पोरे,अभंगराव,लेंगरे,चव्हाण यांच्यात रस्सीखेच..

गतवेळी झालेल्या ऊपसरपंच निवडणूकीत संग्राम गायकवाड यांनी बाजी मारली होती.यावेळी ऊपसरपंच पदासाठी संजय अभंगराव, सोमनाथ पोरे,संजय लेंगरे,चंद्रकांत चव्हाण यांची नावे पुढे येत आहेत. निवडणूकीवेळी परिचारक गटात गटबाजी झाली होती. त्यानंतर दोन्ही गटाचे मनोमिलन होऊन सरपंच निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यामुळे गावपातळीवर सक्रिय असलेल्या गुलाबराव पोरे गटाचा सरपंच होणार की गोसावी गटाचा होणार याची ऊत्सुकता शिगेला पोचली आहे.

सौ. कविता पोरे यांचा खुर्ची सोडण्यास नकार..!

विद्यमान सरपंच सौ. कविता तुकाराम पोरे यांची बिनविरोध निवड एक वर्ष कालावधीसाठी करण्यात आली होती. त्यांचा बराचसा कार्यकाल कोरोना परिस्थिती हाताळण्यात गेला असुन विकासकामे करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याने त्यांनी खुर्ची सोडण्यास नकार दिल्याचे खाञीलायक वृत्त आहे.ग्रामपातळीवरील पक्षश्रेष्ठी त्यांची मनधरणी करत असून हा वाद स्थानिक पातळीवर न सुटल्यास यामध्ये विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक यांना लक्ष द्यावे लागणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *