विठ्ठल कारखाना पुन्हा सुरु करणे हीच आ.भारतनानांना खरी श्रद्धांजली – अभिजीत पाटील

उपरी, व सरकोली येथील सभासदांनी केला अभिजीत पाटलांच्या गटात प्रवेश.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सहकारीच राहिल.
थकीत ऊस बील कामगार पगार देऊनच पुढील हंगामाची मोळी टाकणार..!

श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचार अभिजीत आबा पाटील यांचा जोरदार सुरू आहे. तुंगत, पटवर्धन कुरोली आणि त्यानंतर भालकेच्या गावात म्हणजेच सरकोली येथे अभिजीत पाटील यांनी विचार विनिमय बैठकांचे आयोजन केले असता त्यास शेतकरी सभासदांनी बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

अभिजीत पाटील यांच्याकडून सातत्यापूर्वक नियोजनाने प्रचारात आघाडी घेतली गेलेली दिसत आहे. साखर कारखानदारीत चोख व्यवस्थापन, स्वच्छ हेतू आणि कष्ट आणि अभ्यासाची तयारी यांची बैठक असेल तरच कारखाना सक्षमपणे चालू शकतो. सभासद, कामगारांचे हित अबाधित ठेवत अत्यंत कार्यक्षमपणे आणि पुनरागमनाचे एक आदर्श मॉडेल अशा पद्धतीने आपण कारखाना चालवून दाखवू शकतो हा आत्मविश्वास पाटील यांनी सभासदांना दिला.

यावेळी अभिजीत पाटलांच्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेऊन सरकोली गावचे सजंय श्रीकृष्ण भोसले व उपरीचे गोरख गंगाराम नागणे यांनी पाटील यांच्या गटात जाहीर प्रवेश केला..विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करणे हीच भारतनाना भालके यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे आवाहन सभासदांना करत त्यांनी विठ्ठल परिवारातील सर्वच सभासदांना हाक दिली आहे. पुढे कारखानदारी आणि त्यातील आव्हाने बदलत असल्याचे त्यांनी सांगितले, चेअरमन असो की संचालक मोळी टाकल्यापासून तर साखर निर्यात होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास या लोकांनी केला पाहिजे तरच कारखाना टिकू शकतो, वाढू शकतो असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. पुढे बोलताना, ‘थकीत उसाची बिले दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही. कर्मचारी – कामगार यांची देणी देखील दिले जातील’ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले धनंजय काळे राजाराम बापू सावंत गायकवाड सर दत्ता नागणे दत्ताभाऊ व्यवहारे दशरथ बाबा जाधव प्राध्यापक मस्के सर,भाऊ पाटील गणेश खुर्द संजय भोसले गोरख नागणे बाळासाहेब सपाटे सुधीर कराळे नाना भोसले नंदकुमार बागल आनंद बापू भोसले सुरेंनभाऊ भोसले निवास काका भोसले पंडित आप्पा भोसले रामहरी भोसले हणमंत पाटील यांसह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *