महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेसाठी विविध विकास कामांना २ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. या निधीमुळे पंढरपूर शहरातील विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. सदर निधी उपलब्ध होणेकामे आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर शहरासाठी या निधीमुळे भौतिक सोयी – सुविधा खूप सक्षम आणि व्यापक होणार आहेत.
या निधीअंतर्गत पंढरपूर शहरातील जुनी पेठ येथे जुने शौचालयाच्या ठिकाणी नवीन शौचालय बांधणे व पंढरपूर शहरातील तुळशी नगर येथील सुमित खटावकर घर येथे रोड लाईट बसवणे २२ लाख, पंढरपूर शहरातील अकबर अली नगर येथील के. जी. एन. मेडिकल ते बशीर माणिक तांबोळी घर रस्ता तयार करणे, पंढरपूर शहरातील उंच विठोबा येथे ड्रेनेज लाईन टाकणे व पंढरपूर शहरातील नंद यशोदा आखाडा गोपाळपूर रोड येथे बोअर, मोटर पाण्याची टाकी व १२ मी उंचीचा हायमास्ट बसविणे २३ लाख, पंढरपूर शहरातील अनिल नगर येथील दत्त मंदिर ते हनुमान मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, पंढरपूर शहरातील भक्ती शक्ती चौक येथे १२मीटर उंचीचा हायमास्ट बसविणे व पंढरपूर शहरातील शिवपार्वती नगर सर्वे नं.१०२/२ ओपन स्पेस संरक्षक भिंत व पेव्हिंग ब्लॉक व बैठक व्यवस्था करणे १४ लाख, पंढरपूर शहरातील सर्वे नं.२९/२समता नगर प्लॉट नं.२२च्या शेजारील ओपन स्पेस जागेस संरक्षक भिंत व पेव्हिंग ब्लॉक बैठक व्यवस्था करणे १० लाख, पंढरपूर शहरातील मंगळवेढेकर नगर गट नं ८०/ड ओपन स्पेस मधील तुळजाभवानी मंदिराच्या समोरील सभामंडप बांधणे १० लाख..
पंढरपूर शहरातील प्रभाग क्र – २ हनुमान मंदिर व दत्त मंदिर समोर सभामंडप बांधणे १५ लाख, पंढरपूर शहरातील प्रभाग क्र – १० भीमनगर कडबे गल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप बांधणे १५ लाख, पंढरपूर शहरातील के.बी.पी कॉलेज येथे तिरंगा नगर येथे ओपन स्पेस प्लॉट नं ४७८० मध्ये संरक्षक भिंत, पेव्हिंग ब्लॉक व बैठक व्यवस्था करणे १० लाख, पंढरपूर शहरात येथील अक्षत बंगलोज मधील गणेश मंदिर परिसर सुशोभीकरण करणे १४ लाख, पंढरपूर शहर येथील महाराणा प्रताप चौक नवी पेठ येथे १२ मी हायमास्ट बसविणे, पंढरपूर शहरातील सांगोला रोड सावित्रीबाई फुले नगर बोर्ड पासून आर बी टेलर ते गजानन जोशी घर ते वसंत देवमारे घर आणि राव गुरुजी घर रस्ता करणे व पंढरपूर शहरातील शिवाजीनगर गणेश मंदिरासमोर बोअर, मीटर पाण्याची टाकी व हायमास्ट बसविणे, बांधणे १६ लाख, पंढरपूर शहरातील यशवंत गृहनिर्माण सोसायटी वसंत नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर हायमास्ट, पेव्हिंग ब्लॉक व बैठक व्यवस्था करणे १० लाख, पंढरपूर शहरातील बेळगावकर गॅरेज पाठीमागे पसायदान ट्रस्ट (नाशिक) रस्ता तयार करणे १० लाख, पंढरपूर शहरातील इसबावी येथे मारुती शिंदे घर ते सचिन चव्हाण व विजय पावले ते सिकंदर ढवळे घर रस्ता करणे पंढरपूर शहरातील इसबावी येथे साई मंदिरासमोर १२ मीटर हायमास्ट बसविणे १३ लाख, पंढरपूर शहरातील जुना कासेगाव रोड ते ब्रह्मदास पाटील घर ते रौफ मुलाणी घर रस्ता करणे १० लाख..
पंढरपूर शहरातील इसबावी येथील दत्त मंदिरापासून पूर्वेकडे सचिन शिंदे घर ते प्रकाश गुंड घर रस्ता करणे १० लाख, पंढरपूर शहरातील इसबावी येथील अब्बासो इनामदार सर घर ते सतीश सातारकर घर रस्ता करणे १० लाख, पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र २ डाळे गल्ली येथे तालीम दुरुस्त करणे १५ लाख, पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत शाकुंतल नगर समता नगर, शिंदेशा येथील खुल्या मैदानामध्ये उद्यान विकसित करणे ३३ लाख.
देवांची भूमी असणाऱ्या पंढरीमध्ये देशभरातून अनेक वारकरी भक्त दरवर्षी देव दर्शनासाठी येत असतात. पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी व येथील स्थानिक नागरिकांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी भौतिक सोयी – सुविधा सक्षम करण्यासाठी व पंढरपूर वासियांचे जीवनमान उंचविण्यासाठी उपलब्ध केलेला हा निधी पंढरपूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा सर्व समावेशक सेवासुत आहे. आमदार आवताडे यांची विकासाची ही व्यापक दृष्टी पंढरी चालौकिक आणखी समृद्ध आणि विस्तारित करेल –
शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम काळे