कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्यात आले आहेत.
मात्र माढा तालुक्यामध्ये कोरोना अथवा ओमिक्रोन या रोगाची रुग्ण संख्या नसल्याने, यामुळे माढा तालुक्यातील बावी गावातील प्राथमिक शाळा सुरू ठेवावी याकरिता स्थानिक पालकांनी आपले मत व्यक्त करून
विद्यार्थी घरी राहून त्यांचे शैक्षणिक अभ्यास पूर्ण होत नाही याकरिता, सर्व पालकांनी मिळून आपल्या गावात किंवा वाडी-वस्तीवर कोरोनाचा एकही रुग्ण नाही याकरिता, शाळा जर सुरू असली तरीही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाही,यामुळे सर्व पालकांनी मिळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने जरी काही प्रमाणात चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, तसेच हॉटेल व इतर आस्थापण सुरू ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी, शाळेमध्ये सामाजिक अंतर ठेवून शिक्षकांनी शिक्षण सुरू ठेवावी व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता
प्रशाशनला शाळा सुरू ठेवावी असे निवेदन बावी या गावातील सर्व पालकांनी माढा येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी बावी गावचे नंदकुमार मोरे, शितल मोरे, सौदागर मोरे,सुरज पाटील,सुरज मोरे,शहाजी माळी, सिद्धेश्वर मोरे आदी पालक उपस्थित होते