शिवरायांनी मावळ्यांच्या अंतःकरणात राष्ट्रनिष्ठा पेरली!

  • समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे
    स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व योगदान अवघ्या विश्वात पोहचले आहे परंतु त्यांची सक्षम प्रशासकीय व्यवस्था जी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबविली हा त्यांच्या कार्यातील अतिशय महत्वाचा भाग आहे. शिवरायांचे मावळे एवढे एकनिष्ठ होते की ते अखेरच्या श्वासापर्यंत कोणाच्याही आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. कोणत्या ठिकाणी कोणत्या कामगिरीसाठी कोणता सैनिक नेमावा? हे राजांकडून शिकावे. कोंडाजी फर्जद यांना लढायला जाण्यापूर्वी त्यांना सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले. यावरून ‘माणूस जिवंत असताना त्यांचा सन्मान करणे’ राजांना खुप महत्वाचे वाटत असायचे. यावरून राजांच्या विचारांतील कल्पकता व नेतृत्वक्षमता समजते. त्यांनी मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली, आणि त्यांना जपले. त्यामुळे मावळ्यांच्या अंगी स्वराज्याबाबत आपलेपणाची भावना निर्माण झाली. एकूणच राजांनी सर्व मावळ्यांच्या अंतःकरणात राष्ट्रनिष्ठा पेरली होती म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.’ असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे यांनी केले.

डॉ.रोंगे सर हे खूप बारकाईने अभ्यास करून त्यावर निर्णय घेतात. आपला वेळ कशासाठी असावा आणि त्याचा वापर कसा करावा हे मी डॉ.रोंगे सरांकडून शिकलो. हे कार्य करण्याची प्रेरणा मी रोंगे सरांकडून घेतली.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना मंत्रालयातील सचिव आनंदराव माळी म्हणाले की, ‘शिवरायांच्या काळातील सैन्य, मावळे हे एकनिष्ठ होते, जिवाभावाचे होते. त्याउलट शत्रूचे सैन्य होते. यासाठी मित्र जमवताना देखील चांगल्या मित्रांमध्ये राहता आलं पाहिजे. यासाठी सहकारी देखील महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असावे व शालेय जीवनात मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. येथील विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससीच्या अधिक स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी प्रशासकीय सोई सुविधांचा लाभ घ्यावा. एकूणच जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण वेळ कुठे घालवला पाहिजे आणि कुठे घालवितो याची जाणीव असली पाहिजे.’ स्वेरीच्या ख्याती बद्दल बोलताना पुढे ते म्हणाले की, ‘माझा भाऊ अमर हा देखील स्वेरीचा माजी विद्यार्थी असून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला नोकरीच्या अनेक संधी मिळाल्या. गेट या परीक्षेत ९९ पेक्षा जास्त स्कोअर घेऊन आज तो एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअर मध्ये स्वेरी अतिशय भरीव असे कार्य करत आहे.’ यावेळी आर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.जे. पी. दफेदार, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट, खेड चे प्राचार्य डॉ.एस. एस. पाटील, भीमराव जाधव, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीचे स्टुडंट कौन्सिलचे सचिव आदित्य जगदाळे, पूजा बत्तुल आणि इंजिनिअरिंग व फार्मसीमधील चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. आदित्य भुसनर व डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *