२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते उद्योजक राजू खरे यांच्या स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना सायकल व गावातील गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप राजू खरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.तृप्ती (ताई) खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मोहोळ तालुक्यात अनेक दुर्गम भाग असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय व शिवसेना नेते राजू खरे यांना जाणवत असल्याने ज्या ठिकाणी गावातील लोकांना रस्ते नाहीत त्या ठिकाणी स्वखर्चाने रस्ते तयार करीत असल्याचे दिसून येत आहे, यातच आता ज्या गावात प्रवासाची योग्य सोय नाही त्यामूळे अशातच गरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व घरी परतण्यासाठी मोठे कसरत करावी लागते या कारणामुळे तालुक्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली येत असल्याने कुटुंबप्रमुख त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नसल्याच्या कारणाने नेमकी हीच गरज ओळखून राजू खरे यांनी स्वखर्चातून मुलांसाठी मोफत सायकल देण्याचा निर्णय निर्णय घेतला व त्याच अनुषंगाने गरीब व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे देखील यावेळी वाटप करण्यात आले. याच माध्यमातून एक कर्तबगार महिला म्हणून तसेच स्वतःचा घर प्रपंच चालवत आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी राजू खरे यांचे बंधू विजूभाऊ खरे,मोहोळ विधानसभा अध्यक्ष प्रकाश (दादा) पारवे, शिवसेना शाखाप्रमुख समाधान भोसले, हराळवाडीचे सरपंच लिंगराज व्हनमाने, चंदनशिवे सर,सतीश जाधव, प्रिया वेळी तसेच येनकी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.