श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमन अभिजीत पाटील यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल व त्यांच्या 39व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी या सत्कारास उत्तर देताना चेअरमन अभिजीत पाटील यांनी सर्व कामगारांचे आभार व्यक्त करून, कारखान्याचे गतवैभव आणण्यासाठी कारखान्याचे सर्व कामगारांनी यापूर्वी प्रामाणिक काम केलेले असून यापुढेही काम करावे. सध्या कारखान्याच्या मशीनरी दुरुस्तीचे कामे चालू असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा मानस असून, येणाऱ्या गळीत हंगामामध्ये 14 लाख 50 हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून सभासद शेतकऱ्यांना पंचवीसशे रूपये ऊसदर देण्यासाठी कामगारांनी कामे करावीत. त्यासाठी कारखान्याच्या कोणतेही आर्थिक अडचण येणार नाहीत तसेच सर्व संचालक मंडळ व कामगारांनी समन्वय ठेवून चांगल्याप्रकारे काम करून कारखाना महाराष्ट्रात नंबर वन आणून पुढील पन्नास वर्ष कोणतीही अडचण येणार नाही, अशी आशा व्यक्त केले. तसेच ऊस तोडणी व वाहतूक नियंत्रणासाठी वाहन मालकांना रुपये दोन लाखाचा पहिला हप्ता देण्यात आला कामगारांना 2019 पासून 31 महिन्यांचा पगार व इतर देणे राहिलेले असून ते टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील.
पुढे बोलताना असेही म्हणाले की, नवीन कामगार भरती करताना जुन्या कामगारांच्या अनुभवांचा विचार करून त्यांना बढती देण्यात येईल. कामगारांच्या आरोग्यसाठी आज कारखाना कार्यस्थळावर ‘विठाई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ पंढरपूर यांच्यातर्फे कारखान्याचे सर्व कर्मचारीवर्गाचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच सर्व कामगार यांच्या घरातील महिलांसाठी नवीन उद्योगाचा प्रयोग म्हणून शिलाई मशीनचे ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे ही पाटील यांनी सांगितले.
सदर या वेळी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ बी.पी रोंगे सर यांनी चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन म्हणाले की, कारखाना फक्त अभिजीत पाटील हेच चालवू शकतात. त्यांनी आपणास केलेले आवाहन असून त्यांच्या आवाहनास आपण सर्व कामगारांनी साथ दिल्यास कारखान्यास पूर्वीप्रमाणे गतवैभव प्राप्त होईल अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलाता रोंगे, संचालक नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, धनंजय काळे, दिनकर चव्हाण, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, अशोक जाधव, साहेबराव नागणे, कालिदास बंडगर, सौ सविता रणदिवे, श्रीमती कलावती खटके, पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, तिसंगीचे सरपंच पिंटू पाटील, सरकोलीचे सरपंच शिवाजी भोसले, व कार्यकारी संचालक डी आर गायकवाड, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.