समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे ‘ग्राहक लकी ड्रॉ’ संपन्न..! 6मोटारसायकल ,12 ग्राहकांना सोन्याचे नाणे ,42 ग्राहकांना चांदीचे नाणे वितरित करण्यात आले.

युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘लकी ड्रॉ’चे बक्षीस वितरण धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील व संचालक अभिजित कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.

देशात दुसर्‍या क्रमांकावर तर राज्यात पहिल्या क्रमांकाचा विक्रीचा मान सध्या समृद्धी ट्रॅक्टरने मिळविला आहे. शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून ग्राहकांना नवनवीन योजना देत शेतकरी सुखी समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उचवावे हाच प्रामाणिक प्रयत्न समृद्धी ट्रॅक्टरचा आहे असे श्री.अभिजीत पाटील म्हणाले.

लकी ड्रॉमध्ये मोटारसायकलचे विजेते श्री.संतोष हरीलाल राठोड रा.लक्ष्मीदहिवडी ता.मंगळवेढा , श्री.समाधान बाबुराव लोखंडे रा.लक्ष्मीदहिवडी ता.मंगळवेढा,श्री.गंगादर विठ्ठल बोराडे रा.रेड्डे ता.मंगळवेढा,श्री.महावीर राजाराम शिंदे रा.आंबे ता.पंढरपूर, श्री.सागर शहाजी घाडगे रा.चिंचोली ता.सांगोला,श्री.संगीता राजाराम यमगर रा.वाढेगाव ता.सांगोला अशा एकूण 6 ग्राहकांना मोटार सायकल बक्षीस देण्यात आल्या. सोनालिका ट्रॅक्टर्स च्या सर्व ग्राहकांना आमंत्रित करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

खास ऑफर म्हणून सोनालिका ट्रॅक्टर्सच्या वतीने १९फेब्रुवारी२०२२ पर्यंत खास शिवजयंती निमित्त 5,25,000 रु मध्ये ’28HP’ हे मॉडेल व त्यासोबत 1 मोटारसायकल मोफत ही योजना ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे त्याच बरोबर छत्रपती DI-745 या मॉडेल वरती कमीत कमी डॉऊनपेमेंट 33333 रु ही योजना ग्राहकांना देण्यात आली आहे.

या कार्यक्रमास धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील, संचालक अभिजीत कदम ,पळशी श्री.हणमंत बापू पाटील, मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर साहेब ,TM श्री.साहिल सिंघला साहेब ,फील्ड ऑफिसर श्री.संतोष गरकळ व सर्व सेल्समन टीम व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *