साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते यामध्ये तब्बल 574 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शिवपुजन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी रक्तदान शिबीराचे उध्दघाटन डॉ. राजेंद्र दास,डॉ. जयंत करंदीकर व डॉ.विलासजी मेहता,गोविंद आबा कुलकर्णी तसेच पो.नि विक्रांत बोधे व डॉ. लकी दोशी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर बागल,अकलाख दाळवाले,डॉ मोहसीन मकणू, समाधान दास, अमरकुमार माने,ऋषीपाल वाल्मिकी,दिलीप बारंगळे, सुधिर गाडेकर,आकाश जगताप अर्शाद मुलाणी, शहनवाज शेख,श्रीकांत बागल,लक्ष्मण पवार,आप्पा कदम,निलेश सुराणा,सचिन गायकवाड,अमोल कुलकर्णी, राजेंद्र वाल्मिकी, युवराज कोळी,पत्रकार विनायक पाटील, सतिश महिंगडे इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
हे शिबिर पार पडण्यासाठी साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या सर्व सभासदानीं तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.