आज दिनांक ३१/०१/२०२२ सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सांगण्यात येते की, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पाल्यांसाठी लवकरच नोकरी शिबिर आयोजित करणार आहेत. तसेच सामाजिक सहकार्याच्या भावनेतून समाजातील ज्या मुलांचे आई-वडील कोविड आजाराने किंवा इतर कारणांमुळे मयत झालेले आहेत. अशा सज्ञान अनाथ मुलांसाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तनाच्या माध्यमातून अवैद्य दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर वेळोवेळी कारवाई करून त्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत त्यांच्या मुलांची अवैद्य दारू व्यवसाय सोडून इतर विषय इतरांमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी मिळावी याकरिता त्यांचे मुलांना ही सदर नोकरी शिबिरांमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. तसेच समाजातील दुर्लक्षित घटक विशेषता पारधी समाजातील मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना देखील सदर नोकरी शिबिरांमध्ये संधी देण्यात येणार आहे.
अशा वरील नमूद गरजू होतकरू युवक व युवतींनी आपली माहिती http://city.ly/60gntmy या गुगल फॉर्म मध्ये दिनांक ०७/०२/२०२२ पर्यंत भरुन सादर करावी सदर लिंक मध्ये माहिती भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास, खालील मोबाईल क्रमांकावर व ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
मो.क्र. ९७६२९१९९९३ / ८०८०६६९५३०
E-mail ID – back office.jobshowcase@gmail.com