सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेवर कोरोनाच सावट असल्याने या यात्रेसाठी प्रशासनाने केवळ 50 जणांनाच परवानगी दिली आहे. सिद्धरामेश्वर यात्रेला सुमारे 900 वर्षांचा इतिहास आहे, मात्र कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी यात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
तैलाभिषेक आणि नंदीध्वजासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असेल आणि त्यासोबतच शोभेचे दारूकाम आणि सुगडी पूजनाला परवानगी देण्यात आलेली नाही.
दरम्यान नंदीध्वज पूजनासाठी मिरवणुकीला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे.
12 जानेवारीपासून 16 जानेवारीपर्यंत सर्व ऑनलाईन दर्शनाप्रमाणे दोन डोसचे लसीकरण झालेले व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल
यावेळी फक्त पन्नास लोकांनाच प्रवेश दिला जाईल असा आदेश मंदिर संस्थेने घेतला असून तसा आदेश मॅनेजमेंट कमिटीनेही घेतला आहे.