स्वेरीच्या आसावरी चव्हाण यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीत निवड..!

पंढरपूरः ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील आसावरी भिमराव चव्हाण यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.


मुंबई येथील ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ (आरआयएल) या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आसावरी भिमराव चव्हाण या विद्यार्थीनीची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ७.५ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ ही एक नामांकित कंपनी आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण झाल्यानंतर आसावरी भिमराव चव्हाण यांनी पुढील शिक्षणासाठी पंढरपूरचे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निवडले. अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन हे यश मिळविले. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्सड टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या आसावरी चव्हाण यांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *