स्वेरीत ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन’ यावर कार्यशाळा संपन्न दहा दिवसाच्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन’ या विषयावर तब्बल दहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेत उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून पुण्यातील सॉफ्टेक सोल्युशन अँड ट्रेनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिवकुमार स्वामी हे होते. आय. टी.क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या जावा या भाषेमधील जावा आणि स्ट्रिंग्सच्या मूलभूत गोष्टींवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन’ च्या मूळ संकल्पनेची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना जावा या भाषेमधील वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशन्ससह फाइल हाताळणीचे प्रशिक्षण दिले गेले.

विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन प्रात्यक्षिकासह करून घेण्यात आले. या कार्यशाळेमध्ये सी.आणि सी. प्लस प्लस चा आढावा घेत जावा भाषेचा इतिहास, त्यातील चिन्हे, वेगवेगळ्या ऑपरेशन्स अशा विविध गोष्टी शिकवल्या. जावा मधील कलेक्शन फ्रेम्सचे कार्य, अॅरे आणि कलेक्शन फ्रेम वर्क प्रोग्राममधील फरक स्पष्ट करण्यात आला. यामध्ये डेटाबेस कनेक्टिव्हीटी जेडीबीसी आणि संबंधित बाबीचे प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये कन्सोल ॲप्लीकेशन, युआय डिजाइन सहाय्यक यासारखे जावा मधील भाग जे युनिट टेस्टिंग एक्झिक्युट हे सक्षम ‘जार’ फाईल्स तयार करतात त्यांचे कार्य पटवून देण्यात आले. या आयोजिलेल्या जावा कार्यशाळेत जवळपास १४२ विद्यार्थी तसेच डॉ. महेश मठपती, डॉ.नीता कुलकर्णी, प्रा.सुजित इनामदार यांच्यासह ११ शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा.संगीता जाधव यांनी केले तर सहसमन्वयक प्रा.स्नेहल अभंगराव यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *