स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक क्षेत्रांमधील कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या विद्वत्तेला माणुसकीची जोड असल्याने ते भारताच्या सर्वांगीण मानव विकासाचे प्रेरणा बीज ठरतात. डॉ.आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारी अशी असून ते राज्यशास्त्र व कायद्याचे गाढे अभ्यासक होते. ग्रामीण भागात जावून विश्वबंधुत्वाची तत्वे पटवून समाज बांधणीचे कार्य त्यांनी हिरीरीने केले. आयुष्यभर विद्यार्थी राहून समाजाला जागृत करण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी केले. कोणत्याही घटकात भेदभाव होऊ नये हा दृष्टीकोन समोर ठेवून त्यांनी राज्यघटना लिहीली.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या ‘महापरिनिर्वाण दिना’ निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पालक प्रतिनिधी संतोष वाघमोडे व कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी ‘महापरिनिर्वाण दिना’चे महत्व सांगून डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना प्रा. खेडकर म्हणाले की, ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ या मंत्रावर भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी समाजासाठी व समाजाच्या विकासासाठी कार्य केले. पंढरपूर मध्ये कराड नाक्याजवळ डॉ. आंबेडकर यांनी पंढरपुरातील बहुजन समाजातील बांधवांना प्रबोधनाच्या जागरात सहभागी करून घेतले.’ असे सांगून डॉ.आंबेडकर यांचे समाजासाठीचे कार्य त्यांनी अत्यंत उत्तमपणे मांडले.

यावेळी सौ. वाघमोडे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार, एम.सी. ए.चे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एस.ए.लेंडवे, प्रा. भास्कर गायकवाड, डॉ. वृणाल मोरे, प्रा.मंगेश सुरवसे, अमोल चंदनशिवे, बाळासाहेब नाईकनवरे यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *