अकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्स सोलापूर संस्थेच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून दरवर्षी समर कॅम्प व्यक्तिमत्व शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने याहीवर्षी पन्हाळा कोल्हापूर येथे 04 मे ते 15 मे 2024 या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन केले गेले. सामाजिक व युवा क्षेत्रातील योगदान लक्षात घेत यावर्षीचा पुरस्कार पंढरपूरचे सामाजिक युवा कार्यकर्ते लखन (दादा) चौगुले यांना गौरव सन्मानपत्र प्रदान करण्यात आला.
गौरव तुमच्या सेवेचा, गौरव तुमच्या कर्तुत्वाचा, गौरव तुमच्या समाज मनाचा, याच पद्धतीने माणसात देव शोधणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पावन नगरीत, पांडुरंगाच्या कृपेने, करवीर निवासी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने, अकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्सच्या वतीने लखन चौगुले यांचा सत्कार सन्मान करत, आजवर सामाजिक व युवा क्षेत्रामध्ये प्रेरणादायी कार्य केल्याने कार्याची योग्य दखल घेत युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरल्याने यासाठी लखन दादा चौगुले यांना आदरपूर्वक सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.