वालचंद शिक्षण समूहांतर्गत मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील नूतन विद्यालय प्रशाला येथील जेष्ठ लेखनिक नितीन पंढरे सर यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा निवृत्तीचा निरोप देण्यात आला.
वालचंद शिक्षण समूहांतर्गत आपण आपली प्रदिर्घ सेवा ‘शिक्षण हाच धर्म’ या ब्रीदावालीला अनुसरून दिलात.आपल्या सारख्या अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्यामुळे संस्थेचा नावलौकिक झाला आहे. आज आपण सेवानिवृत्त होत आहात… आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध आनंदी वातावरणात… आपल्या कुटुंबीयासोबत जावा. आरोग्यपूर्ण जीवन आपल्याला लाभो, अशी सदिच्छा डॉ. गांधी यांनी व्यक्त केली.
नितीन पंढरे सर हे प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत असल्याने, अत्यंत शांत,मनमिळाऊ व सत्शील स्वभावाचे,सतत हसतमुख असणारे, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यी असो किंवा पालक असो त्यांची सन्मानाने व आदराने विचारपूस करणारे, एक कर्तव्यनिष्ठ व आदर्श लेखनिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गावातील प्रत्येकाशी त्यांची आदराची नाळ जोडलेली आहे. त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त अनंत शुभेच्छा आष्टी गावातूनही देण्यात आला. त्यांना निरोगी आरोग्य लाभो व त्यांच्या हातून समाजसेवा घडावी असे प्रतिपादन आष्टी गावातील ह.भ.प श्याम काका डंके यांनी म्हणाले.
यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी मायेची शाल पांघरून पुषपगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी विश्वस्त पराग शहा, WIT चे प्राचार्य डॉ. सचिन गेंगजे, WCAS चे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, HNCC चे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, गुरुकुलचे प्राचार्य श्री अशितोष शहा, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित हेरले यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.