सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे 49 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुकयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 49 हजार वह्रयांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती उद्योग व व्यापार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात सहकार, राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेल्या कल्याणराव काळे यांनी सहकाराबरोबरच समाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य केलेले आहे. मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, वसंत केसरी कुस्ती स्पर्धा, राज्यस्तरीय लावणी महोत्सव, वसंतदादा काळे पुरस्कार वितरण सोहळा अशा विविध उपक्रमातून त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना कालावधीमध्ये जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक कोव्हीड रुग्णांवर उपचार केले तर त्याच कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन आधार दिला. कोरोना कालावधीमध्ये मयत झालेल्या पालकांच्या मुलांना शैक्षणिक खर्चासह कायमस्वरुपी शिष्यवृती सुरु करुन त्यांनी राज्यात वेगळा प्रयोग राबविला आहे.
येत्या 4 सप्टेंबर रोजी कल्याणराव काळे यांना 49 वा वाढदिवस असून त्यानिमित्त पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 49 हजार वह्रयांचे वाटप करण्यात येणार आहे तर पंढरपूर येथील रामकृष्ण वृध्दाश्रम, मेजर कुणाल गोसावी अंधशाळा, श्रीसंत तनपुरे महाराज मठ, नवरंगे बालकाश्रम, पालवी प्रतिष्ठान, मुलांचे बालसुधागृह, तसेच गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात येणार आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सर्वरोग निदान व उपचार शिबीर, सायकल बॅक संकल्पनेअंतर्गत वाडीकुरोली येथील वसंतदादा शैक्षणिक संकुलामधील 29 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधुन 10 सपटेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाखरी येथील आनंदी विनायक मंगल कार्यालय येथे प्रा.गणेश शिंदे यांचे तरुणाईपुढे आव्हाने या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प.जयवंत महाराज बोधले भूषविणार आहेत सदर कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन फाटे यांनी केले आहे.