जगद्गुरु तुकोबाराय असे म्हणतात की, “कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा” या उक्तीप्रमाणे मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावातील एका तरुण मुलाचा अपघातात गंभीर जखमी झाला असून कुटुंबाची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्यावर हा प्रसंग ओढावले आहे. तरी हा प्रसंग त्यांच्या कुटुंबावर ही अचानक अत्यंत वाईट प्रसंग येऊन ठेवला आहे.
आष्टी गावचा तरुण युवक अनिकेत चव्हाण हा पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी असून वय वर्ष 22 याचा गेल्या आठवड्यात पंढरपूर-कुर्डूवाडी रस्त्यांवर आष्टी या गावी गंभीर अपघात झाला. अनिकेत याचे वडील आष्टी येथेच एका खाजगी दवाखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने, साहजिकच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.चि.अनिकेत याला पंढरपुरातील लाईफ लाईन या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार चालू आहेत उपचारासाठी लागणारा आत्तापर्यंतचा खर्च परिस्थितीनुसार कुटुंबाने शक्य होईल तेवढे आर्थिक खर्च करण्यात आला.
हा झालेला अपघात गंभीर स्वरूपाचा असून हॉस्पिटलचा खर्च जास्त होणार असल्याने अनिकेत च्या पुढील उपचारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे यावे असे आवाहन देखील वेगवेगळ्या माध्यमातून अनिकेतच्या मित्रांकडून व चव्हाण कुटुंबीयांकडून आवाहन करण्यात येत आहे.
या आर्थिक मदतीसाठी दिपक चव्हाण 99 22 01 24 00 किंवा राहुल चव्हाण 95 61 88 89 27 या फोन पे नंबरवर आपले मदत पाठवावी अधिक माहितीसाठी पंढरपुरातील लाईफ लाईन या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनिकेत चव्हाण या रुग्णांसंदर्भात अधिक माहिती विचारू शकता.