१७ नोव्हेंबर रोजी आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना अंतर्गत रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्युट आॕफ टेक्नाॕलाॕजी ,चिंचवड येथे घेण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची अंतिम लढत पिंपरी चिंचवड तंञनिकेतन यांच्याशी झाली.यावेळी एकूण १२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
विजेत्या खेळाडु मध्ये पियुष घाडगे,जयेश बाविस्कर,अभय चौधरी , तारलोकसिंह खेतावत, ओंकार कढले यांचा समावेश होता. त्यांना प्रभारी प्राचार्य डाॕ.ए.एस.चांडक, संघव्यवस्थापक एस. जी. नेहतराव , क्रीडा प्रमुख प्रा.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.