वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर, भगवान महावीर स्टडी सेंटर व श्री. भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अहिंसा तत्त्वज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत नूतन विद्यालय,आष्टी प्रशालेने मिळवला द्वितीय क्रमांक. या स्पर्धेत इयत्ता 9 वी तील कु. प्रणिता माने, कु. प्रांजली तनमोर,कु. सायली सावंत व कु.आदिती भोसले या विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना रोख पारितोषिक 800 रु., प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी वालचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्रमुख अतिथी वालचंद कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक श्री राव सर, देशभूषण कुलभूषण विद्यालय, कुंथलगिरीचे मुख्याध्यापक प्रेमचंद देवसाळे, वालचंद कॉलेजचे उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, प्रा. डॉ. महावीर शास्त्री सर उपस्थित होते.
यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक अजित हेरले ,पर्यवेक्षक धैर्यशील पवार सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.तरी या सर्व विद्यार्थिनीना श्री. संजय पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.