श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 05.00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापुर आयोजित तालुका क्रीडा अधिकारी पंढरपूर व श्री विठ्ठल सह. सा. कारखाना लि. वेणूनगर श्री विठ्ठल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वेणूनगर ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रणजितसिंह नाईक- निबाळकर खासदार माढा लोकसभा मतदार संघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी माजी आ नारायण (आबा) पाटील यांनी भूषविले. सदर 01 व 02 जानेवारी 2013 रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेचा समारोप समारंभ श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे व प्रशाला कॉमटीचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी महादेव कसगावडे उपसंचालक क्रीडा व युवक संचालनालय पुणे नितीन तारळकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी सत्येन जाधव साहेब तालुका क्रीडा अधिकारी, गणेश पवार सर राज्य अथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक श्री विठ्ठल सह सा कारखान्याचे व्हा.चेअरमन सौ. प्रेमलता रांगे, प्राचार्य बी. पी. रोगे, कार्यकारी संचालक डी आर गायकवाड महाराष्ट्र केसरी पे छोटा मगर, रावसाहेब मगर उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर स्पर्धक खेळाडूना उद्देशून म्हणाले की कोणत्याही खेळात प्रामाणिकपणे मेहनत केल्यास यश मिळतेच हे प्रतिकूल परिस्थितीतूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविल्याचे . करतारसिंग, खाशाबा जाधव यांचे उदाहरण देवून सांगितले.
श्री विठ्ठल सह.सा. कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील स्पर्धेच्या उद्धघाटन प्रसंगा बोलताना म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेच असून त्या स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर अभ्यासाबरोबरच व्यायामाची गरज आहे म्हणूनच जगाच्या ओलम्पिक मध्ये भारताला स्थान मिळवायचे असेल तर खेळाडूंना चांगल्या शिक्षणाबरोबर आर्थिक ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मा.आ. नारायण आबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज खेळाडूंना खऱ्याअर्थाने शिष्यवृत्ती देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री विठ्ठल सह सा कारखान्याचे तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी केले तर प्रमुख पाहुण्याचे स्वागत श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य मा. श्री विठ्ठलराव नागटिळक यांनी केले. यामध्ये पुणे शहर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर व ग्रामीण सोलापूर शहर व ग्रामीण या जिल्हयातील नामवंत 480 कुस्ती खेळाडूनी भाग घेऊन डोळयाचे पारणे फेडणारे कुस्त्या करून कुस्तीकांना मंत्रमुग्ध केले. सर्व विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारीतोषक मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. या पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्तीसाठी पंच म्हणून धनराज भुजबळ, अंकुश अकिल, नितीन शिंदे, राजेंद्र कनसे, तानाजी कसरे, जितेंद्र कनसे यांनी उत्कृष्टपणे काम केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चव्हाण एस. बी. तर पर्यवेक्षक नागणे एस. के यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगताा झाली.