गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ च्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्रा.सोनाली पांडुरंग पाटील यांना मुंबई विद्यापीठातील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिटयुट, तथा व्हीजेटीआय माटुंगा येथून ‘डेव्हलपमेंट/ इम्पृव्हमेंट इन वॉटर फिचींग एड टू एज द बर्डन ऑफ रुरल उमन इन इंडिया’ या विषयामधून पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. के. के. सांगळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
प्रा.सोनाली पाटील यांना पीएच.डी. च्या काळात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्यासह स्वेरीतील इतर प्राध्यापक व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. ‘डॉ. सोनाली पाटील या स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग विभागात गेल्या १० वर्षांपासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी ०६ रिसर्च पेपर्स सादर केले आहेत तसेच त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून १० रिसर्च पेपर्स देखील प्रकाशित झाले आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल संस्थेतर्फे वेणूनगर, गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आणि संस्थेच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांच्या हस्ते स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, प्रा.संजय मोरे, कु.पूजा रोंगे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे यांच्या उपस्थितीत डॉ.सोनाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. सोनाली पाटील म्हणाल्या की, ‘मला मिळालेल्या या यशाचे प्रथम श्रेय मी स्वेरीला देते.
स्वेरी मध्ये उच्च शिक्षणासाठी दिले जाणारे प्रोत्साहन व सर्वांचे सहकार्य यामुळे मला हे पीएच.डी.चे यश प्राप्त झाले आहे.’ पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे यांच्यासह, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी डॉ.सोनाली पाटील यांचे अभिनंदन केले.