पेनूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व ख्वाजापीर या हिंदू मुस्लिम ऐक्य असणाऱ्या गावाची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून होत असून यावर्षी देखील पेनूर गावाला सोलापूर गड्डा यात्रेचे स्वरूप येणार आहे. मागील वर्षी देखील पेनूर गावामध्ये ऐतिहासिक यात्रा भरवली होती, यावर्षी त्यापेक्षाही जास्त मोठी यात्रा भरवण्याचा प्रयत्न यात्रा कमिटी व ग्रामपंचायत पेनूर यांनी केला आहे.
पेनूर गड्डा यात्रेसाठी देवस्थान पंचकमिटी ग्रामपंचायत यात्रा कमिटी व गावातील तरुण मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.यात्रेतील धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असून सोमावर दि.२० मार्च रोजी संदल भव्य जंगी मिरवणूक सायंकाळी चार वाजता होणार आहे तर मंगळवार दि.२१ मार्च रोजी कव्वाली मुकाबला कार्यक्रम सायंकाळी सात वाजता,बुधवार दि.२२ मार्च रोजी दुपारी बारा वाजता पाडवा वाचन तसेच न्यू फिनिक्स फ्रेंड्स ग्रुप पेनूरतर्फे सिद्धेश्वर प्रसाद (खीर) वाटप करण्यात येणार आहे.सायंकाळी पाच वाजता गजे हेडाम मिरवणूक तर रात्री आठ वाजता धुमाकूळ आर्केस्ट्रा बारामती,हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
या यात्रेमध्ये भव्य दिव्य लाईट डेकोरेशन सहित मोठमोठे पाळणे, लहान मुलांचे खेळ ब्रेक डान्स जम्पिंग झपाक,रेल्वेगाडी, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने जादूगारवाला असे अनेकविध कार्यक्रम या यात्रेत पाहायला मिळणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ पेनूर व पेनीर पंचक्रोशीतील नागरिकांनी व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी ग्रामपंचायत पेनूर यांनी केले आहे.
चरणराज चवरे, जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर तथा ग्रा.प.सदस्य पेनूर.