गेल्या दोन महिन्यापूर्वी पंढरपूर येथे सार्वजनिक शौचालयमध्ये कृष्णा तिमा धोत्रे या बालकाचा मृतदेह संतपेठ येथे आढळून आला. परिसरातील लोकांनी पाहिले असता तो मृतदेह कृष्णाचाच असल्याचा समजलं, त्या मुलाच्या शरीरातील काही भाग गायब झाला होता. यामुळे स्थानिकांनी व प्राथमिक माहितीनुसार अनेक तर्क-वितर्क काढण्यात आले. तर त्या लहान मुलावर झालेली घटना ही हल्ला नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे अनेक नेत्यासह आमदार समाधान आवताडे, भगीरथ भालके, प्रशांत परिचारक, दिलीप धोत्रे यांनीदेखील पोलिसांना याची सखोल चौकशी करिता मागणी केली होती.
मात्र या घटनेला दोन महिने होऊन देखील अद्यापही कुठलाच धागेदोरा पोलिसांना सापडले नाहीत. तसेच पोस्टमार्टमचा रिपोर्ट अहवाल देखील वेळेत ठरले असतानाही अद्यापही का आला नाही, याचे देखील नागरिकांना प्रश्न पडला आहे. शिवाय या बालकाच्या कुटुंबीयांनी देखील हा हत्या असल्याची शक्यता वर्तवली होती. तरीही या प्रकरणाचे गुढ आणि रहस्य बनले असून पोलिसांच्या तपासात आणि वैद्यकीय अहवालात अजूनही काहीच बाबी समोर आले नाही. याकरिता वेळोवेळी प्रशासनाकडे या तपासाबाबत विचारले असता पोस्टमार्टमचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती कळू शकेल असं सांगण्यात आले.
म्हणूनच प्रशासनाला जागे करण्यासाठी तसेच या प्रकरणी मुख्य हा तपास लवकरात लवकर होऊन तपासांतील महिती समोर येऊन लवकर त्या निष्पाप मुलाचे मृत्यूचे रहस्य समोर यावे, याकरिता पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व वडार समाजाच्या वतीने दिनांक 20/03/2023 रोजी सकाळी नऊ वाजता संत पेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले येथून ते तहसील कार्यालय पंढरपूर येथे आक्रोश मोर्चाचे आंदोलन होणार असल्यासाचे माहिती सर्व वडार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मयत कृष्णा तिमा धोत्रे या निष्पाप चिमुकल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन समस्त पंढरपूर शहर व तालुक्याच्या वडार समाजाकडून आयोजित केले असून या मोर्चाला जास्तीत जास्त वडार समाजातील सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मयत कृष्णा यांचे कुटुंबीयांकडून भावनिक आवाहन देखील करण्यात आले आहे.