मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजेच शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी या गावांत सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये रोड-वर असलेल्या छोट्या-मोठया हॉटेलमध्ये राजरोसपणे मद्य-विक्री चालू असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
तर गावात कल्याण व कल्याण नाईट तसेच मेन मुंबई यासह आदी नावाने असलेल्या काही पान टपऱ्यांमध्ये खुलेआम पणे मटका घेत असल्याचेही दिसून आले हा व्यवसाय धंदा दिमाखात सुरू असून त्यास कसल्याही प्रकारची भीती नसल्याने व या खेळामध्ये एका ठिकाणी बसून 10℅ कमिशन मिळत असून अनेक तरुण याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. यामध्ये ओपन, क्लोज ओपन पत्ती, क्लोज पत्ती, जॅकपॉट संगम अशा अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. तर या खेळामध्ये अगदी कमी पैशांमध्ये अधिक पैसे मिळवण्याचे आमिष नागरिकांना लागल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर अनेक जण खाजगी सावकारीच्या जाळ्यात अडकले आहेत परंतु हे सर्व उघड उघडपणे होत असताना प्रशासनाची यावर कारवाई करणे गरजेचे असताना मात्र तसे होताना दिसून येत नाही.
वास्तविक पाहता तालुक्याच्या ग्रामीण भागामधील अवैध धंदे व त्यातून होणारे गुंडगिरी प्रवृत्तीच्या नागरिकांना रोखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने त्याची खबरदारी ही घेतली आहे, मात्र मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी खुलेआम पणे मद्य विक्री व मटका घेतला जात असल्याचे दिसून येते. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करताना दिसत नसल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनीच स्वतः याबाबत अधिक लक्ष देऊन मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील ओपन मटका क्लोज करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.