मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राज्य पर्यटन विभागाअंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामधून तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना आ आवताडे म्हणाले की,अध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची वैभवशाली परंपरा असलेल्या या मतदारसंघात विविध पर्यटन स्थळे विकसित करून येथील पर्यटन संकल्पनेला चालना देण्यासाठी व पर्यटन स्थळांची निर्मिती कारण्यासाठी निधीची आवश्यकता होती सदर पर्यटन विकास निधीमुळे दोन्ही शहरामधील पर्यटन स्थळांचा लौकिक वाढविण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे.पर्यटन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मतदार संघातील विविध ठिकाणांचा विकास करणेकामी निधीसाठी राज्य पर्यटन विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या निधीची मागणी केली होती.
मागणीची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ना.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून व सहकार्यातून हा निधी मंजूर झाला असल्याचे आ आवताडे यांनी आहे.
सदर निधी अंतर्गत मंजूर झालेली कामे –
● पंढरपूर येथील यमाई – तुकाई तलाव सुशोभीकरण करणे, ★पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील गाव तलाव सुशोभीकरण करणे.
●मंगळवेढा येथील कृष्ण तलाव सुशोभीकरण अंतर्गत येथे खडीकरण व डांबरीकरण करणे, तारेचे कुंपण करणे,पेव्हिंग ब्लॉक बसवणे,वृक्षारोपण करणे, बैठक व्यवस्था करणे, नाला बांधकाम करणे,व विद्युतीकरण करणे.