पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटचे कॅम्पस इन्चार्ज, वसतिगृहाचे व्यवस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.मुकुंद मारुती पवार यांना सिव्हील इंजिनिअरिंगमधून ‘फिजीबिलीटी ऑफ कन्वर्जन एक्झीटींग वॉटर स्कीम इन टू २४ x ७ कंटीन्युअस वॉटर सप्लाय’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधप्रबंध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये सादर केला होता.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व डॉ.नितिन सोनजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रा.पवार यांनी पीएच.डी.पूर्ण केली. त्यांना वडील मारुती पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, स्वेरीतच कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ.मिनाक्षी पवार यांच्यासह स्वेरीच्या इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. ‘स्वेरी’ या संस्थेच्या नावातच ‘रिसर्च’ हा शब्द असल्याने सुरुवातीपासूनच स्वेरीमध्ये संशोधनास प्रोत्साहन दिले जाते. स्वेरीमध्ये असणारे संशोधनपूरक वातावरण, संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांचे विशेष मार्गदर्शन, विविध संस्थासोबत असणारे सामंजस्य करार, उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधनपर प्रयोगशाळा या सर्व बाबींमुळे स्वेरीतील वातावरण हे संशोधनास अतिशय पोषक बनले आहे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीतील पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांची संख्या वरचेवर वाढत आहे. आज स्वेरीमध्ये सुमारे ३५ प्राध्यापक हे पीएच.डी. धारक असून सुमारे ३० प्राध्यापकांची पीएच.डी. सुरू आहे. वाढत्या व्यापामधून डॉ.पवार यांनी पीएच.डी. पूर्ण केल्याबद्दल त्यांचा स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते व डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार व बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी प्रिय असलेले डॉ.पवार हे स्वेरीमध्ये २००१ पासून कार्यरत असून त्यांनी ज्ञानदानाबरोबरच जवळपास १४०० विद्यार्थी व ११०० विद्यार्थिनी असलेल्या ६ वसतिगृहांचे स्थापनेपासून पालकत्व स्वीकारले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करत ‘शिक्षणाशिवाय पर्याय नाही’ या मतावर ठाम असलेल्या डॉ.पवार यांचा विद्यार्थ्यांवर उत्तम कंट्रोल असल्यामुळे पालक देखील निश्चिंत असतात. स्वेरीतील प्रत्येक कार्यक्रमाचे, येणाऱ्या पाहुण्यांचे उत्तम नियोजन करून अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यात पडद्यामागची भूमिका ते उत्तम प्रकारे पार पाडत असतात. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल डॉ.मुकुंद पवार यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, इतर पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.