पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत येथील गट नं ४१७ मधून महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा ४० मिटर रुंदीचा उजणी उजवा कालवा जात आहे परंतु छोरिया प्राॅप्रर्टीज ॲन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांनी सदर ४० मिटर रुदीच्या कालव्यापैंकी ३५ मिटर रुंदीचा कालवा बुजवून त्यात प्लाॅट पाडून त्या प्लॉटची जैन हे विक्री करुन शासकीय जमिन हडप करत असल्याने त्यांच्यावर फौजदारी प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाखरी येथिल सागर अनंता माने यांनी केली आहे.
पंढरपूर येथिल कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंढरपूर भीमा पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी यांनी सदर घटनास्थळी जाऊन स्थळ पहाणी करण्यात आली.
त्यानंतर सागर माने यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने पांटबंधारे विभागाकडून कन्हैयालाल देवीचंद जैन यांना नोटीस बजावली असून सात दिवसांच्या आत कालवा क्षेत्रामध्ये केलेले प्लॉटिंग काढून कालवा पूर्ववत करून न दिल्यास महाराष्ट्र अधिनियम १९७६ अन्वये कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे