सामाजिक कार्यासाठी तप्तर असलेले मुंबईतील मुलुंड येथील पाखले कुटुंबांकडून पंढरपूर येथील श्री गणेश रुग्ण सेवा मित्र मंडळ संचलित निवासी मूक-बधिर मतिमंद विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य बरोबरच खाऊवाटप व अन्नधान्याचे हे वाटप श्री.पुंडलिक नरहर पाखले यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित राहून हा उपक्रम पार पडला.
यावेळीं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून स्वागतही करण्यात आले, तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय या हेतूने व नुकताच अधिक मास लागल्याने पंढरपूर मध्ये मोठ्या श्रद्धेने भाविक येत असतात. त्यापैकीच मुलुंड येथील पाखले कुटुंबीय पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनास आले असता अनावश्यक खर्च टाळून मूक-बधिर व मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, पेन, खाऊ-वाटप तसेच अन्नधान्याचेही या संस्थेला देण्यात आले, त्यामुळे शाळेच्या वतीने महाजन सर यांनी पाखले कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पाखले कुटुंबीयांचे ज्येष्ठ सदस्यांनी बोलताना असे सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावे या उद्देशाने वह्या व पुस्तके भेट देत इतरांनीही असेच अनुकरण करावे व मतिमंद मूकबधिर, अस्थिवंग बांधवांना सहकार्य करावे आवाहन करत सामाजिक कार्यास मदत जोपासावी. तसेच संस्थेच्या सर्व शिक्षकांनाही करत असलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करत पाखले कुटुंबीयांकडूनही आभार मानण्यात आले.