कुणाचे झाले कल्याण, कोण मारतय बोंबा ! म्हणे सहकार, हा तर स्वाहाकार..!

नावाचा सहकार आणि सगळा स्वत:चा उद्धार; नावाचे जन कल्याण,सगळे काही स्वाहा; पंढरपूर तालुक्यातील राजकारणाची चवच वेगळी असल्याचा अनुभव, इथल्या सामान्य शेतकऱ्यांना नेहमीच घ्यावा लागत आहे. सहकार शिरोमणी की बाताडयांचे मुकुटमणी?आपसूकच लोकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे, तर कारखान्याचे सभासद देखील आता विचारू लागले आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

भाळवणीच्या माळरानावर वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा साखर कारखाना उभा केला. शेतकरी बांधवाचा तळमळीतून हा कारखाना उभा राहिलाही, वसंतदादा यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात होता, पण आयती विरासत मिळालेल्या कुणालाही याची फारशी पर्वा नसते, येथेही वेगळे काही सांगायलाही नको आणि ते घडलेही. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे तसे सोपे असते,पण अशा रेघोट्या ओढनेही ज्याला जमत नसेल, त्याच्या बुद्धीची कीव तर कुणी करणार.

सहकार शिरोमणीची निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली, शेतकरी, सभासदांच्या कल्याणाच्या नावाने ढोल बडवणारे, आपले कल्याण करून बसले पण,सभासदांचे काय ? त्याचे उत्तर कोण देणार? भली मोठी आश्वासने देत,आणि जमेल तेवढे लोणी लावत काळे यांनी निवडणूक पदरात पाडून घेतली खरी, पण पडद्यामागे दडलेले काळे-बेरे तसेच राहिले ना, कारखान्याला दीडशे कोटींचे कर्ज मिळाल्याचा ढोल, निवडणुकीत एवढा वाजला की,कानाचे पडदे फाटून गेले. सभासदांना वाटले, निवडणूक झाली की आता आपले पैसे मिळणार,पण कसलं काय,ते बसले कल्याण करून आणि हे बसले ** वाजवत.

अजूनही काही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम मिळाली नाही,मग ** बडवणार नाही तर दुसरे करणार तरी मग काय? ज्यांनी मत दिलं त्यातील अनेकजण आता आपलेच थोबाड बडवत बसले असतील, सभासंदांचे सोडा,जे आपल्या उपयोगाला पडतात, त्यांची सुद्धा जाणीव न ठेवणारे कुणाचे कल्याण करणार आहेत? अहो, सावलीपेक्षाही अधिक जवळ असलेले, आणि सगळे मार्ग बंद झाले तरी दिशा दाखवणारे, कवडे यांना देखील कात्रजचा घाट दाखवला गेला होता.. तिथं सामान्य सभासदांचे काय?

ज्यांना राजकारण कळत नाही त्यांना सहकार काय डोंबल्याचा कळणार? पण आपलेच कल्याण करण्याच्या नादात, सगळेच काही डावावर लागते.हे देखील कळायला लागते,असो..सभासद ओरडत आहेत आणि कुणीतरी आपले कल्याण करून घेत आहे.पण वारंवार हेच घडेल,आणि लोक मूर्ख बनत राहतील. असा मूर्खपणाचा विचार कुणाच्याही अंगलट आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरे..!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *