चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल..!

पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील काही दिवसांपुर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ दखल घेतली आहे. त्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्यास सूचना केल्यामुळे उपनगरातील लोकांचे आर्थिक नुकसान टळनार आहे.

या उपनगरातील लोकांना अनेक वर्ष शेतसारा कर आणि नगरपालकेतील कर असे दोन्ही कर भरावे लागत होते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत होता. याबाबत चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे उपनगरातील लोकांनी आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यानुसार पाटील यांनी १७जुलै रोजी उपमुख्यमंत्री यांना याबत एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात वरील करापैकी फक्त नगरपालिका कर घेण्यात यावा. या भागातील लोकांना नगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे मध्ये समावेश करण्यात यावा. एक घर एक कर घेऊन नागरिकांचा आर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी केली होती.

वरील देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र प्राप्त होताच हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने पंढरपूर नगरपालिकेसाठी २१सप्टेंबर रोजी पत्र पाठविले असून याबाबतची प्रत चेअरमन अभिजीत पाटील यांना देण्यात आली आहे.

विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केवळ साखर कारखानदारी हेच काम पाहत बसले नाहीत. त्यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील अनेक महत्वाचे प्रश्न मांडले आहेत. यासाठीच त्यांची नेहमी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे भेट असते. त्यामुळे पंढरपूर भागातील महत्वाचे प्रश्न आमदार कडून मांडले जात नसले तरी अभिजीत पाटील यांच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या अभिजीत पाटील यांच्याकडून अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचा पक्का विश्वास पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेला वाटू लागला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *