मोहोळ येथील जेष्ठ पत्रकार संजय आठवले यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
पत्रकार संजय आठवले हे मागील २२ वर्षापासून दै. सुराज्यचे मोहोळ तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करतात . सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते . अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.त्याच बरोबर अनेक फळबाग घोटाळा, रेशन दुकानातील धान्य भ्रष्टाचार अशी प्रकरणे उघडकीस आणण्यात त्यांनी महत्वाचे योगदान आहे. त्याच बरोबर डॉ. सतीश केदारी प्रणित मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या प.महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम करत आहेत याची दखल घेवून महाराष्ट्र राज्य शिक्षक व कर्मचारी महासंघ यांचे वतीने त्यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार सपत्नीक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, समाज कल्याण अधिकारी खामीतकर , सेवा निवृत पोलीस अधिकारी केरु जाधव, जैन गुरुकुल प्रशालेचे प्रा.आशुतोष शहा, महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब भालशंकर , प्राअशोक पाचकुडवे , प्रा.प्रकाश शिंदे, यावली शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जगताप, मोहोळ तालुका भाजपचे उपाध्यक्ष विनोद (बाबा) देशपांडे,पत्रकार महेश सोवनी, अविनाश पांढरे, वसीम शेख, शिवसेना (उबाठा) चे विभाग प्रमुख सागर गायकवाड आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते .