मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी साखळी उपोषण, भजन, महिलांचा व पुरुषांचा कँडल मार्च तसेच मराठा समाजाच्या युवकांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला गेला.आमच्यासाठी शासन हे मायबाप आहे, मात्र ज्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे संविधानिक पद्धतीने आंदोलने करत असून ती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येत असल्याने समस्त सकल मराठा समाजाने आष्टी येथील जरांगे पाटील चौक या ठिकाणी आंदोलने सुरूच ठेवले.
यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग व प्रतिसाद लाभला इतर सामाजिक संस्था, संघटना व इतर समाजाने देखील या आंदोलनास पाठिंबा दिला. मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाबाबत आंदोलन व गरजवंत मराठा समाजाच्या न्याय हक्काबाबतच्या भाषणांची ध्वनिफीत ध्वनीशेपकांवर लावले गेले, “तुमचं आमचं नातं काय जय, जिजाऊ जय शिवराय”, “एकच मिशन मराठा आरक्षण”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी साखळी उपोषणाचा परिसर दणाणून गेला तसेच शिवशाहीर विजय व्यवहारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा व मराठा आरक्षणाबाबतचा इतिहास मांडला.
प्रसंगी अमरसिंह पाटील,सनिराज पाटील,खासेराव पाटील,साळवी सर, बंडू शहा, पिंटू व्यवहारे,पोपट व्यवहारे,बाळासाहेब व्यवहारे,महेश पाटील,पिंटू सुळे,ऍड.सचिन गुंड,धीरज पाटील,सतीश पाटील,अनिकेत पाटील,डॉ.मनोज पाटील,रामेश्वर व्यवहारे,बाळासाहेब शेवाळे,रुपेश पाटील,सज्जन घाडगे,मनोज पाटील,वेदांत पाटील,दिगंबर व्यवहारे,दादासाहेब केदार,मंथन पाटील,आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.