पै.शुभम चव्हाण ठरला वसंत केसरीचा मानकरी..!

शुभम चव्हाण आणि राहुल काळे यांच्यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर ‘ वसंत केसरी ’ किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये पै.शुभम चव्हाण याने राहुल काळे यास तीन गुनांनी मात करुन ‘वसंत केसरी’ किताब पटकावला. राहुल काळे उपविजेता ठरले. कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते व बबनराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता पैलवान शुभम चव्हाण यास चांदीची गदा व प्रथम मानांकन एक लाख एक हजार रुपये रोख व प्रशस्ती पत्र आणि उपविजेता राहुल काळे यांस 51 हजार वसंत केसरी ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले.

यावेळी मोहोळ विधानसेभेचे आमदार यशवंत माने, सांगोला विधनसभेचे आमदार शहाजीबापू पाटील, धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगेसर, सांगोला तालुक्याचे शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, विठ्ठल सह.साखर कारखान्याचे मा.चेअरमन भगिरथदादा भालके, मा.संचालक युवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, कुषीराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटील,जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सदस्य सुरेश पालवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधानदादा काळे, निशिगंधा सह.बँकेचे चेअरमन आर.बी.जाधव, व्हा.चेअरमन सतिश लाड, यशवंतराव चव्हाण नागरी सहकरी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार उपस्थित होते.

यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी वसंतदादा पैलवान असल्यामुळे त्यांच्या कुस्तीचा वारसा मागील अनेक वर्षापासून कल्याणराव काळे जपत आहेत, त्यामुळे ग्रामिण भागातील मल्लांना प्रेरणा मिळत असून, असेच सामाजिक, धार्मिक क्रिडा उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्व.दादांच्या पुण्यतिथी निमित्त्‍ सन 2003 पासून कुस्ती मैदान आयोजित करण्यात येत असून, या अखाड्यातील बरेच मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी यावेळी सांगितले.

कारखान्याचे संस्थापक स्व्‍.वसंतरावदादा काळे यांच्या 22 व्या पुण्य्‍तिथीनिमित्त्‍ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणराव काळे बहहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शुभहस्ते कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. कुस्ती आखाड्याचे पुजन भिमा कारखान्याचे संचालक बिभिषनआप्पा वाघ यांचेहस्ते करण्यात आले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे घेण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत ओपन गटात 86 किलो पेक्षा जास्त वजनी गटातील महाराष्ट्रासह इतर राज्यातील 60 पैलवानांनी सहभाग नोंदविला. प्रथम मानांकित चार कुस्त्यामध्ये बाभुळगावचा रविराज चव्हाण यांनी पै.रविराज दुबे यांस दोन गुणांनी मात करुन तृतीय क्रमांकाचे 25 हजार, वसंत केसरी ट्रॉफी पटकावली तर उपविजेता पैलवान 11 हजार बक्षिस, वसंत केसरी ट्रॉफी पटकावली. विजेत्या पैलवानांना वसंत केसरी ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवुन मान्यवरांचे शभहस्ते गौरविण्यात आले. या कुस्ती स्पर्धेमध्ये बाद फेरीप्रमाणे रुपये 100 पासून ते 5000 रुपयापर्यतच्या कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या यामध्ये 600 मल्लांनी प्राविण्य दाखवले.

या कुस्तीस्पर्धेस पंच म्हणुन प्रा.धनराज भुजबळ, एनआयएस कोच प्रा.दत्तात्रय माने, पै.सद्दाम जमादार, प्रा.संतोष पाटील, यांनी काम पाहिले. व्यवस्थापक म्हणुन मल्ल सम्राट पै.रावसाहेब मगर, मारुती भोसले, मोहन नागटिळक, महारास्ट्र केसरी-छोटा रावसाहेब मगर, विभिषण पवार, शिवाजी मदने, महादेवभाऊ देठे, दिनकर कदम, इब्राहिम मुजावर, बजरंग आटकळे, अमित डोंबे, राजु शेंबडे, समाधान अभंगराव, सादिक मुलाणी, सोमनाथ सुर्वे, समाधान सुरवसे, मारुती माळी, रामचंद्र देवकर, सिध्देश्वर जाधव, सोमनाथ नागटिळक, माऊली काळे, मोहन घोलप, महादेव दगडे, तानाजी केसकर, संजय चव्हाण, बाळासाहेब चवरे, देविदास ठवरे,मुबारक मुलाणी, शरद यलमार,सर्जेराव चवरे, मारुती माळी, ज्ञानदेव लोखंडे म्हणुन काम पाहिले.

या जंगी मैदानात कुस्ती कलेतील अनेक डाव प्रतिडावाने सहकार शिरोमणी कारखान्यावरील कुस्ती मैदान प्रेक्षणीय व लक्षवेधक ठरले. हालगी व घुमक्याचा ठेक्याने आणि वस्ताद धनाजी मदने व वैजीनाथ रणदिवे यांच्या कुस्तीच्या धावत्या समालोचनाने उपस्थित कुस्ती शौकीनांमध्ये नवचैतन्य्‍ निर्माण केले. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार कारखान्याचे संचालक यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत सोपान कोळेकर, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, सर्व संचालक मंडळ, स्व.दादांवर व मा. कल्याणराव काळे यांचेवर प्रेम करणारे पंचक्रोशितील सरपंच, हजारो कार्यकर्ते, कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब काळे तसेच पदाधिकारी व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कुस्ती प्रेमी, पत्रकार उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *