स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची ‘नुलाइफ फार्मा’ या कंपनीला औद्योगिक भेट..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथील ‘नुलाइफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला नुकतीच औद्योगिक भेट दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते.

वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाण्याच्या हेतूने आणि अभ्यासाचाच एक भाग असलेल्या या औद्योगिक भेटी मुळे विद्यार्थ्यांना जागतिक बाजार पेठेतील सध्याची गरज, उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अभ्यासपूर्ण माहिती मिळते. या अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठा हातभार लागतो. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा अभ्यासक्रमाचाच एक आवश्यक भाग आहे. त्यामुळे अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित संकल्पनेच्या व्यावहारिक दृष्टिकोनासह वास्तविक कामकाज व औद्योगिक वातावरणाचा मोठा परिचय देतात. यासाठी अशा भेटींची गरज आहे. औद्योगिक भेटीमध्ये नुलाईफ फार्मास्युटिकलचे वर्क मॅनेजर माधुरी देशमुख यांनी स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून कंपनीची संपूर्ण माहीती दिली. औषधनिर्माण क्षेत्रामध्ये ‘नुलाइफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी १९७३ पासून कार्यरत आहे. या भेटीमधून विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक केंद्रांना लागणारे साहित्य, औद्योगिक क्षेत्रातील कच्चामाल आणि पक्का माल, ट्रान्सपोर्ट व विक्री, किरकोळ विक्री तसेच कच्चा माल व त्याचे कोठार, प्रोडक्शन विभाग, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी एन्शुरन्स आदी विभागात चालणाऱ्या कामाबद्दल व तिथे वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली. या औद्योगिक भेटीमुळे इंडस्ट्रीबद्दल विद्यार्थ्यांना असणारे कुतूहल आणि शंकांचे निरसन झाले तसेच उत्पादन व्यवस्थापक राजेश जाधव व प्रशांत सस्ते यांनी विविध बाबींची विस्तृतपणे माहिती दिली.

औद्योगिक भेटीसाठी स्वेरीचे प्लेसमेंट ऑफीसर प्रा. प्रदीप जाधव, प्रा. दत्तात्रय यादव, प्रा.हेमंत बनसोडे, प्रा.स्नेहल पाटील, प्रा.कांचन नगराळे, प्रा.कीर्ती महामुनी तसेच फार्मसीच्या अंतिम वर्षातील जवळपास ५४ विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाले होते. एकूणच अभ्यासाच्या दृष्टीने या औद्योगिक भेटीचे विशेष महत्व आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *