‘शिवजयंती’ म्हटलं की तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते.शिवजयंती साजरी करत असताना सर्वत्र अनेक विधायक उपक्रम राबविले जातात.यातूनच समाजाला एक प्रकारचे एकतेचा संदेशही दिला जातो. यावेळी मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत गोपाळकृष्ण बांधकाम समिती व गावातील मुलींच्या हस्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली,या प्रतिमेच्या पूजनावेळी लोकनेते साखर कारखान्याचे संचालक मदनसिंह पाटील, माजी सरपंच राजाभाऊ गुंड, ग्रामसेवक दीपक शेळके, कुरणवाडी गावचे माजी सरपंच दत्ता पवार, ग्रामपंचायत सदस्य अँड.अमरसिंह पाटील, विशाल गिड्डे, प्रा.अशोक साळवी, डॉ.आप्पासाहेब चव्हाण, संजय क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली.
मावळा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदानासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूर या रक्तपेढीला आमंत्रित केले गेले तर या रक्तदान शिबिरास तब्बल १७८ तरुणांनी ऐच्छीक रक्तदान केले अजून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.त्याचप्रमाणे जयंतीदिवशी पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनी साठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धेसाठी तब्बल ६५ विद्यार्थी तर सायंकाळी वकृत्व स्पर्धेसाठी ७१ विद्यार्थ्यांनी भाषणाची कला सादर करत सहभाग नोंदविला. यावेळी प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणुक मोठ्या थाटामाटात व जल्लोष शिवजयंती साजरी केली तर राहुल शिवाजी गुंड यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले गेले,अश्या पद्धतीने शिवजयंती समारोप झाला.
यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गुंड, उपाध्यक्ष उमेश व्यवहारे, खजिनदार रमेश गुंड, धनाजी गुंड, पृथ्वीराज पाटील, सचिन कदम, शुभम गुंड, भैय्या शितोळे, बाळासाहेब गुंड, हनुमंत चव्हाण, तानाजी चव्हाण,नितीन पाटील, डॉ.सुधाकर गुंड, प्रशांत गुंड, नवनाथ गुंड, रणजीत गुंड, संदीप गुंड, सुजय गुंड, संतोष माळी, आकाश सावंत, बापू भांगे, जयसिंह गुंड,विराज जाधव, शुभम यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर माने गुरुजी, दीपक सावंत तर आभार प्रदर्शन सुरज गुंड यांनी मांडले.