छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘सह्याद्री प्रतिष्ठाणकडून’ विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी..!

शिवजयंती’ आणि सह्याद्री प्रतिष्ठान जणू काही एक समीकरण बनलं आहे, १९ फेब्रुवारी शिवजयंती येण्याच्या काही महिने अगोदरचं त्याच उत्तमरीत्या नियोजन केले जाते. विशेष म्हणजे हे सर्व सह्याद्री प्रतिष्ठानच्या टीममधील सर्वच सदस्य एकत्रित येत याचं उत्तम नियोजन केले जाते,त्याच अनुषंगाने जोरदार तयारी करत शिवजयंती साजरी केली जाते.

शिवजयंतीच्या रात्री १२:०० वाजता आष्टी गावातील सर्व महिला एकत्रित येत शिवपाळना म्हणत शिवजन्मोत्सव साजरी करण्यात आला. तर मोहोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, आष्टी गावातील हिंदू, मुस्लिम, बौध्द, जैन, प्रार्थना मंदिरात सेवा देणारे पुजारी, यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सह्याद्री प्रतिष्ठान विशेष गौरव पुरस्कार नूतन विद्यालय प्रशालेचे मुख्याध्यापक मा.अजित हेरले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय ढगे यांना प्रदान करण्यात आले. सह्याद्री गुणवंत विध्यार्थी कु.वैष्णवी शिवाजी शेवाळे,चि.विकास कैलास इंगळे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रतिमेच्या पूजनावेळी मोहोळचे तालुक्याचे गटविकास अधिकारी आनंद कुमार मिरगणे, आष्टी गावचे विद्यमान सरपंच डॉ.अमित व्यवहारे, उपसरपंच निखिल गुंड, ग्रामसेवक दीपक शेळके, माजी सरपंच महादेव आण्णा व्यवहारे, माजी सरपंच काकासाहेब पाटील, माजी सरपंच भजनदास व्यवहारे, माजी उपसरपंच वसुदेव व्यवहारे, प्राचार्य साळवी सर, कल्याण गुंड, मेजर भगवान व्यवहारे, सदस्य सुहास चव्हाण, मंदिरातील सर्व पुजारी यांच्या उपस्थितीत शिवजयंती संपन्न झाली.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत १००हुन अधिक मुलांनी सहभाग घेतला,या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होताना दिसून आले.त्याचप्रमाणे शिवजयंती दिवशी पहिली ते दहावीच्या व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धेलाही १००हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तर यावेळी प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.तर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणुक मोठ्या थाटामाटात व जल्लोष शिवजयंती साजरी करून समारोप करण्यात होत असतो.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अमित व्यवहारे , उपाध्यक्ष रामेश्वर व्यवहारे, खजिनदार निलेश पाचपुंड, सचिव बाळासाहेब शेवाळे, सज्जन घाडगे, स्वप्नील व्यवहारे, सचिन व्यवहारे, दिगंबर व्यवहारे, अविनाश भोसले, अमर माने, कृष्णदेव यादव, कृष्णदेव चव्हाण परमेश्वर व्यवहारे, प्रमोद व्यवहारे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय व्यवहारे गुरुजी, दिगंबर व्यवहारे तर आभार प्रदर्शन परमेश्वर व्यवहारे यांनी मांडले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *