माढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या मोडनिंब ग्रामपंचायच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी बाजी मारत अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडली. या तंटामुक्ततिच्या निवडीत 6 उमेदवार असताना त्यातील चार जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. शेवटी दुरंगी लढत लागली असता त्यामध्ये प्रशांत गिड्डे यांनी बाजी मारली.
या निवडीवेळी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ त्यांच्या उपस्थितीत पार पडले. निवडीनंतर प्रशांत गिड्डे यांनी बोलताना असे म्हणाले की, गावात शांतता व सलोखा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तसेच स्वर्गीय गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील कामाचा ताण कमी तसेच गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटावीत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे बोलले. या निवडीबद्दल गिड्डे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.