अखेर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे टेंडर निघाले..!

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला नुकतीच बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे,हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या मात्र मंजुरीनंतर दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली असून काही दिवसात या योजनेचे काम खरच सुरू होणार असल्याचा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला आहे .
पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि अवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार १३ मार्च २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६९७.५१ कोटीच्या  मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी दिली मंगळवेढेकरांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण केल्याने मंगळवेढा तालुक्यातून फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांकडून या अगोदरही अशी मंजुरी मिळाली होती यात नवीन काय? असं म्हणत या मंजुरीची खिल्ली उडवली जात होती मात्र दुसऱ्याच दिवशी या कामाचे पहिल्या टप्प्यातील 111 कोटीची निविदा पब्लिश करण्यात आल्याने लोकांना आ आवताडेंच्या शब्दावर विश्वास बसू लागला आहे

 या टेंडर मध्ये  पंप हाऊस बांधकाम करणे,उर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम सुरू करणे, शेलेवाडी येथे वितरण कुंड तयार करणे,या कामाचा समावेश असून दिनांक 15 मार्च 2024 ते ४ एप्रिल 2024 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर निविदा उपलब्ध करण्यात आली आहे,  22 मार्च ते 26 मार्च या कालावधीत जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे या निविदा दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी उघडण्यात येणार आहेत त्यामुळे नुसत्या मंजुऱ्या देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा धंदा राजकारण्यांनी मांडला हे असे म्हणणाऱ्यांना एक प्रकारे चपराक बसली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *