टेंभुच्या पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू- आ समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आले असून या भागातील जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी आ. समाधान आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन निश्चितपणे टेंभूमधील पाणी मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी गावभेट दौऱ्यात दिली.

मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न हा केवळ राजकीय भांडवलाचा विषय न ठेवता याकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पाहत आ समाधान आवताडे यांनी शनिवारी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व टेंभू अधीक्षक गुणाले यांच्याशी संपर्क करून या भागातील पाण्याविना शेतकऱ्यांनी झालेली परिस्थिती कथन केली असता लवकरच या योजने अंतर्गत पाणी सोडण्याचे आ आवताडे यांना आश्वस्त करण्यात आले असल्याचे आवताडे यांनी सांगितले.

टेंभू योजनेतून पंढरपूर तालुक्यातील तावशी, तनाळी, तरटगाव, सिद्धेवाडी, चिचुंबे, शेटफळ तसेच मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगाव, घरनिकी, मारापूर, देगांव, शरदनगर, ढवळस, धर्मगांव, मुढवी या माण नदीकाठच्या गावांना हे पाणी मिळणार आहे.

यावर्षी खरीप हंगामामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीचे ढग निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी व पशुधन जगविण्यासाठी पाण्याअभावी खूप मोठ्या जल संकटांचा सामना करून पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. वरील गावांना या योजनेतून कायमस्वरूपी पाणी मिळवून देण्याची तरतूद झाल्यास तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मतदारसंघातील विविध विकास कामांना भरघोस निधीच्या रूपाने चालना देणारे आ आवताडे यांनी या योजनेच्या पाण्यासाठी आपली राजकीय ताकत पणाला लावली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *