शंकरगाव ह्या गावात आत्तापर्यंत स्वातंत्र्य काळापासून कधीही या रस्त्यावरती डांबर पडले नसून कोणत्याही कसल्या प्रकारचा डांबरी रस्ता इकडच्या भागांमध्ये झालेला नव्हता पण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून पवन भैय्या महाडिक यांनी या रस्तासाठी अथक प्रयत्न करून हा रस्ता आता सर्व या भागातील नागरिकांसाठी सोयीचा होणार असून या रस्त्यामुळे सर्व या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून शंकरगाव येथील, ग्रामपंचायत कार्यालयात पवन भैया महाडिक यांचा ग्रामपंचायतीचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून खासदार मा.धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून तसेच मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या अथक परिश्रमातून जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील शंकर गाव येथे विविध विकास कामे मंजूर केली आहेत.
यामध्ये शंकरगाव ते कोळी वाडा रस्त्यासाठी १५ लाख रूपये,शंकरगाव येथे स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १० लाख रूपये तसेच सी.एन.बी ओढ्यासाठी ३० रूपये निधी मंजूर करण्यात आले आहे.तसेच चंदनशिवे वस्ती येथे पेव्हींग ब्लॉक रस्त्यासाठी ०५लाख रूपये व विकास नगर रस्ता काँक्रीटीकरणासाठी 5 लाख रूपये, सोनवणे वस्ती येथे पथदिवे साठी ०५लाख रूपये तसेच.
शंकरगाव या गावासाठी तब्बल 70 लाख रूपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मा.पवन (भैय्या)महाडिक यांनी मंजूर करून आणले होते या कामांचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.
यावेळी सरपंच संजय कोळी, संजय म्हमाणे सदस्य, प्रकाश चंदनशिवे, हरिभाऊ सुरवसे, भिमराव म्हमाणे, रवी देशमुख, लिंगादेव होणमाने, बाळासाहेब देशमुख, बाळु जाधव, रामभाऊ होणमाने, राजू खरात, पप्पु शेंडगे, बंडु होनमाने, अतुल सुरवसे, अशोक सुरवसे, सचिन पांढरे, तानाजी आढवले, धनाजी म्हमाने, राजू चंदनशिवे, प्रकाश मोरे संताजी भोसले, बालाजी गायकवाड सर्व पदाधिकारी समर्थक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.