बापरे.! ६ कोटींचा वाळूचा ठेका,गेला २१ कोटीला..!

तीन वर्षानंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलाव हा मुहूर्त मिळाला आहे.९ पैकी ४ ठिकाणावरील ६२ हजार ९२२ ब्रास वाळू लिलावातून महसूल प्रशासनाला 69 कोटी 33 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
ठेकेदाराने सरासरी ११ हजार रुपये ब्रासने वाळू लिलाव घेतले आहेत.
पाच ठिकाणी एकही ठेकेदाराने बोली लावली नाही. या लिलाव प्रक्रियेमुळे आता शहर जिल्ह्यातील बांधकामास मुबलक बाळू उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे नवीन वाळू उपसा धोरणानुसार तीन वर्षासाठी हे ठेके देण्यात आले आहे. दर वर्षानंतर ६ टक्के अधिक महसूल देऊन वाळू उपसा करण्यात येणार आहे.

मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील १५ हजार ७८० ब्रासचा साठा ११ कोटी ९० लाखाला गेला. त्याची शासकीय किंमत ६ कोटी ९० लाख इतकी होती.
जिल्ह्यात राष्ट्रीय हरित लवाद, उच्च न्यायालय, कोरोणा व इतर कारणांमुळे लिलाव होऊ शकले नाही. यंदाही ९ पैकी फक्त ४ ठिकाणी ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला. घोडेश्वर तामदरडी येथील साठा क्रमांक १३ मिरी तांडूर, सिद्धापूर या पाच ठिकाणी एकाही ठेकेदाराने बोली लावली नाही. या ठिकाणांचे लिलाव झाल्याने आता पुढील तीन वर्षे जिल्ह्यातील शासकीय कामासोबतच बांधकामांना मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होणार आहे.
हे लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी नंतर पैसे भरून घेणे व ताबा देण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल अशी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *