बीड: बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील पंचशील नगर रस्त्याचे बोगस काम झाल्याची तक्रार करून देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अन् झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली असून मंत्री धनंजय मुंडेंनी याची दखल घेतली आहे.
ते म्हणाले, की कोणताही रस्ता एका व्यक्तीसाठी नसतो, त्यांनी चौकशीचे पत्र दिले असते तरी चौकशी केली असती. त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू.विशेष म्हणजे ट्राय पार्टीकडून देखील चौकशी करू, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे.