विद्यार्थ्यांनीना हिजाब घालण्यापासून रोखणे खूपच वाईट असून भारतीय संविधानाच्या विरोधात आहे वैयक्तिक स्वातंत्र्यावर पायबंद घालण्यासारखे आहे असे जमियत उलमा ये हिंद या संघटनेने म्हटले असून याबाबतचे निवेदन त्यांनी मोहोळ तहसिल कार्यालयास दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य असून धार्मिक सद्भावनेचे प्रतीक आहे परंतु मुस्लिम विद्यार्थ्यांनीना हिजाब घालण्यापासून रोखणे हे खूपच वाईट आहे, आपल्या संविधानात प्रत्येकाला व्यक्तीस्वतंत्र आहे संविधानाने प्रत्येक व्यक्तीला हक्क दिले आहेत जो तो ज्याच्या त्याच्या आवडीची वेशभूषा परिधान करु शकतो. आपापल्या धार्मिक चालीरीती नुसार चालू शकतो. आपल्या धर्मावर चालताना दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावू नये याची फक्त काळजी घेतली जावी असे संविधानात म्हटले आहे.
कर्नाटक मध्ये मुस्लिम विद्यार्थिनी पूर्वीपासूनच हिजाब घालतात त्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत विनाकारण हा मुद्दा घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. हिजाब घालण्यापासून विद्यार्थ्यांनीना रोखणे खूपच वाईट असून भारतीय संविधानाच्या विरोधात आहे तसेच वैयक्तिक स्वातंत्र्यावर पायबंद घालण्यासारखे आहे असे जमियत उलमा ये हिंद या संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जमियत उलमा ये हिंद चे तालुकाध्यक्ष हाफिज मुजीब, जनरल सेक्रेटरी कारी इंतजार, हाफिज अबुल कलाम, जिब्राईल शेख, उमर शेख, नसीर मोमीन, ऍड विनोद कांबळे, राहुल तावसकर, गौतम क्षीरसागर आदी उपस्थित होते.