श्री. ऐ. प. दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचालित नूतन विद्यालय, आष्टी येथील सहशिक्षक श्री. संजय पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत मराठी विषयात पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. तसेच यापूर्वी देखील 30 नोव्हेंबर 2020 रोजी विद्यापीठ अनुदान आयोग( UGC) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत त्यांनीही पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केलेले आहेत
त्यांचे मराठा सरसेनापती बापू गोखले यांच्या जीवनावर आधारित ‘अजरामर योद्धा नरवीर बापू गोखले ‘ हे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. श्री. रणजितभाई गांधी, विश्वस्त श्री. भूषणभाई शहा, श्री. परागभाई शहा तसेच प्राचार्य श्री. आशितोष शहा सर, मुख्याध्यापक अजित हेरले सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व आष्टी या गावातील सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.