हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती आष्टी ( ता मोहोळ ) येथील राजमुद्रा प्रतिष्ठान व मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने १०१ तरूणांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी करण्यात आली
सुरवातीस महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डॉ आप्पासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लोकनेते शुगरचे संचालक मदनसिंह पाटील व छोटा वक्ता पाटील यांनी शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर शंकर माने गुरुजी यांनी पोवाडा गावून सर्वाना भारावून टाकले
यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत पाटील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड सचीन गुंड, यांचे सह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड राजाबापू पाटील, अॅड अमर पाटील, रविदादा पाटील, बाळासाहेब पाटील, माजी सरपंच शैलेद्र पाटील, महेश पाटील, सनीराज पाटील, प्रमोद गुंड, पोलीस पाटिल खासेराव पाटील, अमरसिंह पाटील, महेंद्र पाटील, धीरज पाटील, एस के चव्हाण, उमेश व्यवहारे, बबन गुंड, मानसिंग पाटील, विकास पाटील, अरविंद पाटील, महादेव गाडे, आदी मान्यवरासह सह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
अक्षय रक्तपेढी सोलापूर चे डॉ उदय रुपनर व त्यांची टीम यांच्या सहकार्यातुन हे रक्तदान शिबीर यशस्वी झाले प्रत्येक रक्तदात्यास हेलमेट सप्रेम भेट देण्यात आले मासमुव्हमेंट संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शंतनू माने यांनी सुत्रसंचालन केले तर प्रदिप सुळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सागर पाटील, धवल पाटील, वेदांत पाटील, विनय शेळके, प्रथमेश पाटील, शंतनू पाटील यांनी प्रयत्न केले.